PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 8, 2024   

PostImage

घरकुलाचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत शासनाला मात्र जाग येईना !


शहरी असो किंवा ग्रामीण भागात शासनाने गरीब व अत्यंत गरजू लोकांनच्या डोक्यावर निवारा असावा या हेतूने घरकुल वाटप केलेले आहे.परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला काही लोकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून किंवा इतरांकडून उसणवार करून घरकुल बांधून घेतले,परंतु 90% गरीब लोकांच्या डोक्यावर निवारा बांधून झालाच नाही.

कारण काय शासनाने पहिला आणि दुसरा हप्ता नित्यनियमाने दिल्या गेला परंतु तिसरा हप्ता मात्र लाभार्थ्यांना मिळाला नाही आणि कित्येक गरिबांचे संसार उघड्यावरच पसरले आहेत.म्हणजे नवीन घरकुलाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.कारण जोपर्यंत तिसरा आणि चौथा हप्ता मिळणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या डोक्यावर छत होणारच नाही.

 ऐन पावसाळ्याच्या दिवसात घरकुल अपूर्णच आहे तर मग विचार करा गरीब माणसाचा संसार उघड्यावरच आहे आणि म्हणून शासनाने उदाशीन अवलंबिल्या गेलेले धोरण थांबवून गरीब व गरजू लोकांच्या डोक्यावर निवारा लवकरात लवकर तयार होईल याचा विचार करावा.

 गरीब लाभार्थ्यांच्या आशा आकांक्षा घरकुलावरच अवलंबून आहे. त्याकरिता गरीब व गरजवंतांची थट्टा न करता तिसरा व चौथा हप्ता लवकर उपलब्ध करून द्यावा,म्हणजे गरीबांना हक्काचं घर मिळेल आणि उघड्यावर पडलेला संसार सावरायला मदत होईल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024   

PostImage

'या' नागरिकांना मिळणार घर बांधायला पैसे; ही आहे मोदी सरकारची …


 प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा 2015 मध्ये ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांसाठी सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश गरिबांना परवडणारी घरे प्रदान करणे आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील देशातील घरांची कमतरता दूर करणे आहे. सध्या केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी डिसेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे.

 

पीएम आवास योजना ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी गरीबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी चालवली जाते. प्रधानमंत्री आवास योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांना घरे बांधण्यासाठी सहाय्य म्हणून 1.20 लाख रुपये दिले जातात.

 

 *घर कोणाला मिळणार नाही?*

ज्यांच्याकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी करत असेल आणि तरीही त्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नसेल, तर अशा परिस्थितीतही तुम्हाला घर मिळणार नाही.

 *घर कोणाला मिळणार?*

● अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. त्याच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कोणतेही कायमस्वरूपी घर नसावे. 

● आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) लोकांचे उत्पन्न वर्षाला 3 लाख रुपयांपर्यंत असावे.

● कमी उत्पन्न गटातील (LIG) लोकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असावे.

● मध्यम उत्पन्न गटातील (एमआयजी-१) लोकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १२ लाख रुपये असावे.

● मध्यम उत्पन्न गटातील (MIG-2) लोकांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 18 लाख रुपये असावे.

 

🖨️ *पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा*

● प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://pmaymis.gov.in/ ला भेट द्या. 

● येथे तुम्हाला मेनू टॅबवर क्लिक करावे लागेल

● त्यानंतर Citizen Assessment पर्यायावर क्लिक करा.

● यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.

● यानंतर तुम्ही थेट ॲप्लिकेशन पेजवर पोहोचाल. येथे विचारलेली माहिती भरा.

● माहितीची पुष्टी केल्यानंतर पुढे जा, येथे तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. यानंतर अर्जही डाउनलोड करा.

● आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज घेऊन तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.

● आपण कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज देखील सबमिट करू शकता.